मुंबई : तुमचं थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन महाग होण्याची शक्यता आहे, कारण बीअरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढणार आहे. नव्या वर्षात बिअरच्या दरात ही वाढ होणार आहे.


बिअरचे दर 35 ते 40 रुपयांनी वाढवण्याची मागणी उत्पादक कंपन्यांनी केली होती, जी राज्य सरकारनं मान्य केली आहे. मात्र बिअरच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांनी वाढ करण्यास सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे.

ऐन नाताळाच्या आठवड्य़ात आणि 31 डिसेंबरच्या तोंडावर होणाऱ्या या दरवाढीमुळे आठवडा अखेरीस होणारी बिअर विक्री मंदावणार असल्याचा अंदाज मद्यविक्रेता संघटनेनं व्यक्त केला आहे.

सध्या माइल्ड बिअरची बाटली सुमारे 135 रुपयांना मिळते, आता तो दर 155 ते 165 रुपयांपर्यंत जाणार आहे. तर स्ट्राँग बिअरच्या 140 रुपयांच्या बाटलीसाठी आता 160 ते 170 रुपये मोजावे लागतील.