मुंबई : रेल्वेच्या तिकिटात 9 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामध्ये राजधानी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस आणि शताब्दी एक्स्प्रेसचा समावेश असेल. या प्रकारच्या ट्रेनमध्ये डायनॅमिक फेअर स्कीम लागू केली जाणार आहे. सर्वात आधी तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशांना याची झळ बसणार नाही.
  डायनॅमिक फेअर सध्या सुविधा ट्रेनमध्ये घेतलं जातं. यात सर्वात आधी तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशांना नियमित तिकिट शुल्क द्यावं लागतं. डायनॅमिक फेअरमध्ये 10 टक्के जागा आरक्षित झाल्यावर ठराविक प्रमाणात तिकिटाचे दर वाढवले जातात. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास महागणार आहे.   सध्या विमानात अशा प्रकारचं डायनॅमिक फेअर द्याव लागतं. 9 सप्टेंबरपासून पहिल्या 10 टक्के जागांसाठी प्रवाशांना कोणतेही जास्त शुल्क द्यावे लागणार नाही, पण त्यापुढील प्रत्येक 10 टक्के जागांसाठी ठराविक प्रमाणात जास्त शुल्क द्यावे लागेल. यातून फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासला वगळण्यात आलं आहे.   काय असेल ही भाडेवाढ:    
राजधानी आणि दुरंतोमध्ये अशी असेल भाडेवाढ
उपलब्ध सीट्स 10% 10% 10% 10% 10% 10% 10% 10% 10% 10%
सेकंड सीटिंग 1X 1.1X 1.2X 1.3X 1.4X 1.5X 1.5X 1.5X 1.5X 1.5X
स्लीपर 1X 1.1X 1.2X 1.3X 1.4X 1.5X 1.5X 1.5X 1.5X 1.5X
3 एसी 1X 1.1X 1.2X 1.3X 1.4X 1.4X 1.4X 1.4X 1.4X 1.4X
2 एसी 1X 1.1X 1.2X 1.3X 1.4X 1.5X 1.5X 1.5X 1.5X 1.5X
1 एसी 1X 1X 1X 1X 1X 1X 1X 1X 1X 1X
X= नियमित तिकिट दर
  शताब्दी ट्रेनसाठी अशी होईल दरवाढ
उपलब्ध सीट्स 10% 10% 10% 10% 10% 10% 10% 10% 10% 10%
एसी चेअरकार 1X 1.1X 1.2X 1.3X 1.4X 1.5X 1.5X 1.5X 1.5X 1.5X
एक्झिक्युटिव्ह क्लास 1X 1X 1X 1X 1X 1X 1X 1X 1X 1X
X= नियमित तिकिट दर