मुंबई : एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील सर्व बँका आज उघडतील. गुरु नानक जयंतीमुळे काल बँकांना सुट्टी होती. त्यामुळे बँकांचे व्यवहार बंद होते. परिणामी एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
बँका आज उघडणार असल्याने मुंबईत विविध ठिकाणी स्थानिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून बँकासमोर स्थानिकांची गर्दी आहे.
कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
बँकांबाहेर चार रांगा
बँकांबाहेर होणारी गर्दी पाहता यापुढे बँकाबाहेर चार रांगा लावण्यात येणार आहेत. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी असं या रांगांचं स्वरुप असणार आहे.
सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!
कोणत्या एटीएममधून अडीच हजार निघणार?
आता एटीएममध्ये 2500 रुपये काढता येऊ शकतात. मात्र प्रत्येक एटीएममध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. तर बदल झालेल्या ATM मधूनच 2500 रु. काढता येणार आहेत.
एटीएममध्ये बदल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून 2 लाख बँक कर्मचारी त्यासाठी काम आहेत.
दरम्यान, गरज नसताना बँकांमध्ये गर्दी करु नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
नोटा बदलण्याची मर्यादा शिथील
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला चार हजारांऐवजी साडेचार हजार रुपयांची रक्कम बदलता येणार आहे.
एटीएममधून दोन हजारांऐवजी अडीच हजारांची रक्कम काढता येणार आहे. याशिवाय इतर बँक व्यवहारांवर लादण्यात आलेली मर्यादा देखील शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार
रुग्णांकडून चेक स्वीकारा : मुख्यमंत्री
चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत राज्यातील सर्व रुग्णालयांना रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे.