नवी दिल्ली: काळ्या पैशांवर लगाम घालण्यासाठी सरकार विविध मार्गांचा आवलंब करत असून यासाठी बँकांना आपल्या सर्व ग्राहकांचे पॅन कार्ड गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत बँकांनीसुद्धा आपल्या सर्व ग्राहकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंत पॅन कार्डची माहिती मागवली आहे. यात केवायसीधारक ग्राहकांनाही आपली सर्व माहिती बँकेत सादर करावी लागणार आहे.
केंद्र सरकारने सर्व खातेदारांना आपल्या पॅन कार्डची माहिती बँकांकडे देण्याचे आदेश दिले असून, बँकांनी आपल्या सर्व ग्राहकांकडून पॅन कार्डची माहिती मागवली आहे. यासाठी बँकांकडून 28 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.
पॅन कार्डची माहिती बँकेत जमा करण्यासाठी बँकांनी आपल्या ग्राहकांना पत्र पाठवले असून, जे ग्राहक आपली माहिती बँकांकडे जमा करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर निर्बंध आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या पत्रामध्ये, 'आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना पॅन कार्डनंबर बँकेत रजिस्टर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क साधावा, ज्यांच्याकडे पॅन कार्ड उपलब्ध नसेल, त्यांनी फॉर्म 60 चा वापर करावा,'' असे सांगितले आहे.
त्यामुळे पॅन नंबर देण्याने, तुमच्या बँक खात्याची माहिती अधिकाधिक सुरक्षित होणार आहे. मात्र, ज्यांनी दुसऱ्या नावाने बँक खाते सुरु करुन त्यात आपला काळा पैसा लपवला असेल, त्यांचा हा मार्गही बंद होणार आहे.
संबंधित बातम्या
पॅन कार्ड आता नव्या रुपात येणार!