बँक युनियन 7000 थकबाकीदारांची नावे जाहीर करणार
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2016 03:35 AM (IST)
अहमदाबाद : द ऑल इंडिया बँक एम्पायइ असोसिएशन गुजरातमधील जवळपास सात हजार थकबाकीदारांची नावे जाहीर करणार आहे. या सात हजारजणांची संपूर्ण माहिती पुढील आठवड्यात सांगण्यात येणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. या सात हजारजणांकडून जवळपास 70 हजार कोटींची द्येयके थकित असून या सर्वांची नावे आणि संपूर्ण माहिती १९ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल, असे बँकेचे सचिव सी.एच. व्यंकटाचलम यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारच्या पाच बँकांचे विलिनीकरण आणि खासगीकरणाविरोधात येत्या २९ जुलै रोजी सर्व बँकांनी एकत्रित येऊन एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जवळपास १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत.