March 2021 Bank Holiday List: बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्यांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्या माहिती असणे गरजेचं आहे. बँकेशी संबंधित आवश्यक कामं असतील तर ती लवकर करुन घ्या कारण बॅंका या महिन्यात विविध राज्यात जवळपास 11 दिवस बंद असणार आहेत. या महिन्यात राज्यात बँका किती दिवस बंद राहतील पाहुयात.
या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यात 11 दिवसांची सुट्टी असेल. या 11 सुट्ट्यांमध्ये 4 रविवारी साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे, तर दुसर्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. याशिवाय बँक कामगारांच्या संपामुळेही बँकेचं काम बंद राहणार आहे.
या दिवशी बँका बंद राहतील
5 मार्च 2021: मिझोरममध्ये सुट्टी असणार आहे. चापचर कुट सणानिमित्त ही सुट्टी आहे.
7 मार्च 2021: या दिवशी रविवार आहे. या दिवशी साप्ताहिक सु्ट्टी असणार आहे.
11 मार्च 2021: महाशिवरात्रीची सु्ट्टी असणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, कश्मीर, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
13 मार्च 2021: या दिवसी दुसरा शनिवारनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.
14 मार्च 2021: रविवार असल्यामुळे या दिवशी सुट्टी असणार आहे.
15-16 मार्च 2021: चार बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँकांचं आंदोलन आहे.
21 मार्च 2021: रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
22 मार्च 2021: बिहारचा स्थापना दिवस असल्यामुळे बिहारमध्ये बँका बंद असतील. केवळ बिहामधअये बँका बंद असतील.
27 मार्च 2021: महिन्याचा चौथा शनिवार असल्याने या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे.
28 मार्च 2021: रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.
29 मार्च 2021: होळी असल्यामुळे यादिवशी सुट्टी असणार आहे. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओड़िशा, पंजाब, उत्तराखंड, सिक्किम, तेलंगणा, मणिपूर, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ़, झारखंड, मेघालय आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद असतील.
30 मार्च 2021: बिहारमध्ये होळीची दोन दिवस सुट्टी असते. त्यामुळे 29, 30 मार्च रोजी बँका बंद राहतील.