नवी दिल्ली: तीन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या रोख व्यवहारांवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी शिफारस केंद्राच्या एसआयटीनं केली आहे. काळा पैसा बाजारात आणण्यासाठी न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.


 

एसआयटीनं सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात, एका व्यक्तीला 15 लाखापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच या संदर्भात कठोर कायदे करण्याचीही मागणीही एसआयटीनं केली आहे.

 

काळा पैसा बाजारात आणण्यासाठी एसआयटीनं उपाय सुचावला आहे. त्याचप्रमाणे तीन लाखापेक्षा अधिक रोख रक्कमेचे व्यवहार करायचे असल्यास त्या व्यक्तीला आयकर विभागाची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय त्याला असा व्यवहार करता येणार नाही. अशीही शिफारस करण्यात आली आहे.