पठाणकोट बॉर्डरजवळ पाकिस्तानकडून धमकीचा फुगा
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 09:56 AM (IST)
नवी दिल्ली: भारतीय सैन्यदलाने पीओकेवर यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यातच शनिवारी रात्री उशीरा पंजाबमधील पठाकोटपासून जवळच असणाऱ्या बमियाल सेक्टरमधून दोन पिवळ्या रंगाचे फुगे जप्त करण्यात आले. या फुग्यांसोबत एक पत्रही मिळाले आहे. उर्दूमध्ये लिहलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. या पत्रात, ''मोदी ऐका, अयूबीची तलवार आजही आमच्याकडे आहे. मोदी सरकार युद्ध करु शकत नाही,'' असं म्हटलं आहे. या पत्राच्या खाली पाकिस्तानी जनता असे नमुद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी घुसले होते. या हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर भारतीय लष्कराचे तीन जवानांना वीरमरण आलं होतं.