Dhirendra Krishna Shastri : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात चर्चेत असलेल्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांची... हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. खरंतर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात याच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्याच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला. धीरेंद्र शास्त्रींच्या या बागेश्वर धाममध्ये नेमका प्रवेश कसा मिळतो आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
बागेश्वर धाममध्ये कसा मिळतो प्रवेश?
प्रवचनामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकाला टोकन दिले जाते
भक्तांना हे टोकन विशिष्ठ तारखेला बागेश्वर धामच्या पेटीत टाकावं लागतं
या टोकनसह भक्तांना एक फॉर्म भरुन द्यावा लागतो
त्या फॉर्ममध्ये आपलं नाव,वडिलांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहावा लागतो
ज्या व्यक्तीचा नंबर लागतो, त्याला बागेश्वर धामकडून संपर्क केला जातो आणि उपस्थित राहण्याची तारीख दिली जाते
त्याच दिवशी बागेश्वर धाममध्ये हजेरी लावावी लागते
हजेरी लावण्याआधी भक्तांना तीनपैकी एका रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधून टाकावा लागतो
सामान्य भक्तांनी लाल रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा
जर विवाहप्रश्नी समस्या असतील तर पिवळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा
आणि भूतबाधा झाली असेल, तर काळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा
उपस्थितांपैकी मोजक्या भक्तांनाच मंचावर येऊन समस्या मांडण्याची संधी मिळते
बागेश्वर धामचे लोक अशा भक्तांना फोनवरुन संपर्क साधतात
आणि त्यांनाच मंचावर उपस्थित राहण्याची मुभा मिळते
जोवर दर्शन होत नाही, तोवर दारु, मांस, कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य असते
बागेश्वर धाममधील पद्धत काय?
धीरेंद्र शास्त्री हे उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवतात. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो. मध्येच मंचावरुन उतरायचं आणि अंगात संचारलेल्या लोकांपर्यंत जायचं आणि त्यानंतर भूतबाधा झालेल्यांना मंचापर्यंत बोलवायचं, अशी त्यांची पद्धत.
बागेश्वर उर्फ धीरेंद्र महाराज जे दावे करतात, तो चमत्कार नसून समाजसेवा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. जेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर महाराजांना चॅलेन्ज केलं, तेव्हापासून तर त्यांच्या दरबारात मीडियाचीही गर्दी झाली आहे.
ही बातमी देखील वाचा