Badrinath Accident: उत्तराखंडच्य बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडले. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुद्रप्रयाग शहरापासून 5 किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली जवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.  


अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 5 जण जखमीआहेत. अद्याप मदतकार्य सुरू आहे. 




दरम्यान, देशाचे रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. रुद्रप्रयाग येथील दुर्घनटेची बातमी अत्यंत दु:खद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. शोकाकुल कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असेही गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.






हेही वाचा


फडणवीसांकडून फेक नरेटिव्हचा आरोप, उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर; शरद पवारांनी करुन दिली म्हशीची आठवण