नवी दिल्ली : निरंकारी समुदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांची कन्या सुदीक्षा त्यांचा वारसा चालवण्याची शक्यता आहे. निरंकारी समुदायाच्या प्रमुखपदी सुदीक्षा यांची नियुक्ती होण्याचे संकेत आहेत.

 
सूदीक्षा या बाबा हरदेव सिंह यांच्या तिसऱ्या कन्या आहेत. सुदीक्षा या निरंकारी समुदायाच्या प्रमुख झाल्यास पहिल्या महिला प्रमुख ठरतील. सुदीक्षा यांचे पती अवनीत सोतिया यांचाही हरदेव सिंह यांच्यासोबत कार अपघातात मृत्यू झाला. सुदीक्षा यांचं 11 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.

 

 


निरंकारी समुदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्यावर बुधवारी दिल्लीच्या निगमबोध घाटात अंत्यसंस्कार केले जातील.

 
कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जाताना शुक्रवारी हरदेव सिंह यांच्या कारचा अपघात झाला होता. देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

 
बाबा हरदेव सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी त्यांचा दिल्लीत त्यांचा जन्म झाला. हरदेव सिंह यांच्या वडिलांच्या हत्येनंतर 1980 मध्ये हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले.

 

संबंधित बातम्या :


निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन