निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
बाबा हरदेव सिंह यांच्या पत्नी निरंकारी पंथाच्या प्रमुख
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2016 04:51 AM (IST)

नवी दिल्ली : बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांची पत्नी सविंदर या निरंकारी संप्रदायाच्या प्रमुख बनणार आहेत. 1929 मध्ये स्थापन झालेल्या निरंकारी पंथाच्या 87 वर्षांच्या इतिहासात माता सविंदर या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या आहेत. यापूर्वी बाबा हरदेव यांची कन्या सुदीक्षा त्यांचा वारसा चालवण्याची शक्यता असल्याचं वृत्त होतं. निरंकारी समुदायाच्या प्रमुखपदी सुदीक्षा यांची निवड होणार असल्याची चर्चा होती.