Ayodhya Verdict Live Update : वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा मिळणार : सुप्रीम कोर्ट

Ayodhya Ram Mandir Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाची जीत अथवा हार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्यातील सौहार्द कायम राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मोदींनी ट्वीट करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील शांती राखण्याचे आवाहन केले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Nov 2019 02:21 PM
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एमआयएमचे खासदार ओवेसी नाखूश. म्हणाले 5 एकर जमिनीची खैरात नको
जमिनीची ऑफर मुस्लीम पक्षकारांनी नाकारावी - असदुद्दीन ओवेसी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बोलताना ओवेसींची संघावर टीका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अयोध्या निकालावर प्रतिक्रिया
अयोध्या निकालावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ट्विटरवर प्रतिक्रिया
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे जय आणि पराजय म्हणून बघू नका, भूतकाळ विसरु आणि पुन्हा एकत्र येऊ : सरसंघचालक मोहन भागवत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला, शहीद कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळणार का? हा जो इतकी वर्ष प्रश्न होता तो निकाल लागला, लवकरात लवकर मंदीर उभं राहावं : राज ठाकरे
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचं सत्तास्थापनेबाबत हे सूचक वक्तव्य आहे का?
या ऐतिहासिक खटल्याच्या निकालानंतर राम जन्मभूमी न्यास कार्यशाळा परिसरात कुठलंही सेलिब्रेशन होणार नाही : विश्व हिंदू परिषद
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 24 तासांसाठी जमावबंदी लागू
अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सुरु असलेल्या सुप्रीम कोर्टातील निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचे स्वागत
मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा देण्याबाबत सुप्रीम कोर्टाची टिप्पण्णी
वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा मिळणार : सुप्रीम कोर्ट
1956 पूर्वी हिंदूंकडून वादग्रस्त जागेवर पूजा, 1856-57 ला नमाज पठणाचे पुरावे नाहीत
सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या खटल्यात निकाल वाचन सुरु, इंग्रजांच्या भूमिकेमुळे हिंदू-मुस्लिम वाद - कोर्ट

सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या खटल्यात निकाल वाचन सुरु, चौथरा, सीता की रसोई यांचं अस्तित्व मान्य, रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख
- सुप्रीम कोर्ट

अयोध्या निकाल : राम मंदिर बाराव्या शतकातलं- पुरातत्त्व विभाग, वादग्रस्त जमिनीवर हिंदूंकडून पूजा सुरु होती - सुप्रीम कोर्ट
,
हिंदूंचा दावा खोटा नसल्याचं स्पष्ट - सुप्रीम कोर्ट
बाबरी मशीद रिकाम्या जागी बनली नव्हती, मशिदीखाली मोठी इमारत होती : सुप्रीम कोर्ट
निर्मोही आखाड्याचा दावा देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळला, निर्मोही आखाडा सेवक नाही, रामलल्लाला कायदेशीररित्या पक्षकार मानलं
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या घरी बोलावली बैठक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृह सचिव, आयबी आणि रॉ प्रमुखांसह बडे अधिकारी बैठकीला उपस्थित
कुठल्याही क्षणी निकाल वाचनाला सुरुवात, कोर्टरुमचे दरवाजे उघडले
अयोध्या खटल्याच्या निकालाचं कव्हरेज
LIVE :
Ayodhya Verdict Live Update : काही मिनिटांमध्ये अयोध्या प्रकरणी निर्णय, सरन्यायाधीश रंजन गोगोई सुप्रीम कोर्टात पोहोचले
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा, निकाल कोर्टाचा, सरकारचा नाही, मात्र गोड बातमी येणार : संजय राऊत
पंढरीत कार्तिकी यात्रा सुरु, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त
अयोध्येमध्ये सशस्त्र दल, आरपीएफ, पीएसीच्या 60 तुकड्या, 1200 पोलिस कॉंस्टेबल, 250 एसआय , 20 डेप्यूप्टी एसपी आणि 2 एसपी अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच डबल लेअर बॅरिकेटिंग, 35 सीसीटीव्ही आणि 10 ड्रोन कॅमेरा देखील लावण्यात आले आहेत, अशी माहिती डीजीपी आशुतोष पांडेय यांनी दिली आहे.
सर्वांनी शांतता राखावी, सरसंघचालक मोहन भगवतांचे आवाहन
अयोध्येचा निकाल आज येणार आहे, न्यायव्यवस्थेने न्यायोचित निर्णय देण्याची व्यवस्था केली आहे, सर्वांनी खुल्या दिलाने निर्णय स्वीकार करून शांतता कायम ठेवावी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाची जीत अथवा हार नाही, पंतप्रधान मोदींकडून शांतता राखण्याचे आवाहन

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरु होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज सुट्टीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

शनिवारी सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असते. मात्र अयोध्या प्रकरणातल्या ऐतिहासिक निकालासाठी शनिवारचीच वेळ निवडण्यात आली. कदाचित न्यायालयात गर्दी होऊ नये, परिस्थिती हाताळणं सुरक्षा यंत्रणांना सोपं जावं यासाठी शनिवारचा दिवस निवडण्यात आला असावा, अशी शक्यता आहे.

आजच्या निकालासाठी एक नंबरचं न्यायालय खुलं केलं जाणार आहे. न्यायालयात केवळ अयोध्या प्रकरणाशी संबंध असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. 16 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. यावेळी इतर अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे इतर न्यायमूर्तीही सहभागी होते. यावेळी सर्वांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षेचा आढावा घेतला होता.


अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.


 


अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा








    • जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.



 




    • सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.



 




    • निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.



 




    • मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.



 




    • महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.



 




    • निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.



 




    • कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.

      वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.



 



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.