Ayodhya Ram Mandir: अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाच्या (Shree Ram) दर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि आजही अयोध्येत रामभक्तांची गर्दी कायम असल्याचं पहायला मिळतंय. राम मंदिर (Ram Mandir) खुलं होण्याआधीच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करायला सुरुवात केलीये. दर्शनासाठी मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी रामललाचं दर्शन घेतलं. काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण झाली होती. भाविकांची ही गर्दी पांगवणं पोलिसांसाठीही मोठी कसरत होती.
दरम्यान, गर्दीचं योग्य नियोजन न केल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाराज झाले. आणि त्यांनी थेट अयोध्या गाठलं. सुरक्षेच्या कारणास्थव सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 8 हजार अतिरिक्त पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आलाय. तर लखनऊमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्या आहेत.
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यानंतर मंगळवारी राम मंदिराच्या अधिकृत उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एक नवा विक्रम झाला. मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी पाच लाख राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतलं. अयोध्येला पोहोचणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता प्रशासनानं येथे येणाऱ्या सर्व वाहनांना तातडीनं बंदी घातली आहे.
प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच प्रेक्षकांची गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज होती. यादरम्यान काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लखनौ येथूनच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मंदिर परिसराची पाहणी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वात आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आणि नंतर त्यांनी स्वतः मंदिर परिसरात पोहोचून सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचं आवाहन केलं. दरम्यान, त्यांनी हवाई पाहणी केली, स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भाविकांच्या सोयीसाठी आठ ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
अयोध्येला येणाऱ्या सर्व गाड्यांवर तात्काळ रोख
श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची ही गर्दी पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: लखनौ येथून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे गर्दीची पाहणी केली. अयोध्येतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही दिवस येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. गाड्यांसाठी केलेलं सर्व ऑनलाईन बुकिंगही रद्द करण्यात आलं असून, भाविकांचे बसेसचे पैसे परत केले जाणार आहेत. श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अयोध्येत पोहोचली तेव्हा प्रधान सचिव (गृह) संजय प्रसाद आणि कायदा आणि सुव्यवस्था महासंचालक प्रशांत कुमार स्वतः गर्भगृहात उपस्थित होते. त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला.