Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनाला, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघ्या काही तासांचा वेळ राहिला आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून निमंत्रित अयोध्येत जमा होत आहेत. बॉलिवूड स्टार्सही यामध्ये आहेत. सुपरस्टार रजनीकांत या कार्यक्रमाला एक दिवस आधीच अयोध्येत आला आहे, तर अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे सोमवारी चार्टर्ड विमानाने अयोध्येत पोहोचत आहेत. 


गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या राम मंदिराचं स्वप्न आता साकार होणार आहे. सोमवारी 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अनेक नावेही अगोदरच पुढे आली होती. हे सर्व या ऐतिहासिक क्षणाचा एक भाग असतील. आता राज्य सरकारने त्या सर्व लोकांची यादी जारी केली आहे, ज्यामध्ये कोण किती वाजता आणि कसे अयोध्येला पोहोचेल हे सांगण्यात आले आहे.


उत्तर प्रदेशने जारी करण्यात आलेल्या यादीनुसार एकूण 506 लोकांना निमंत्रित करण्यात आले असून, हे सर्वजण राज्य पाहुणे म्हणून अयोध्येत येत आहेत. त्यांच्या स्वागतापासून निवास, भोजन, वाहतुकीची सर्व व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यापैकी अनेक जण थेट अयोध्येत येणार आहेत, तर अनेक जण आधी लखनौला पोहोचले आहेत. त्यानंतर ते  अयोध्येला जातील.


अमिताभ बच्चन सोमवारी येणार


अमिताभ बच्चन, अनुपम खेर, साऊथ सुपरस्टार चिरंजीवी, माधुरी दीक्षित, प्रभास 22 तारखेला सकाळी थेट अयोध्येत येणार आहेत. त्यापैकी बिग बी आणि माधुरी दीक्षित खासगी जेटने येतील. तर बाकीचे स्टार्स विमानाने पोहोचतील. याशिवाय रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत एक दिवस आधी अयोध्येत पोहोचले आहेत. तसेच अरुण गोविल हे आधीच अयोध्येत आहेत. धनुष देखील या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. संगीतकार शंकर महादेवन, रणबिद हुड्डा, पवन कल्याण हे देखील लखनौला पोहोचले असून तेथून ते अयोध्येला रवाना होतील.


याशिवाय अजय देवगण, दीपिका चिखलिया, हेमा मालिनी, ज्युनियर एनटीआर, मोहनलाल, मनोज मुंतशीर, एसएस राजामौली यांसारख्या अनेक स्टार्सच्या आगमनाची बातमी आहे. दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या कुटुंबालाही आमंत्रित करण्यात आले आहे.


ही बातमी वाचा: