नवी दिल्ली : अवैध नोटाबदलीप्रकरणी एक्सिस बँकेच्या दोन मॅनेजर्सना ईडीने अटक केल्यानंतर, बँक व्यवस्थापनाने तब्बल 19 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.


एक्सिस बँकेने आपल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये झालेल्या संशयित नोटाबदलीचं फोरेन्सिक ऑडिट करण्यासाठी केपीएमजी या संस्थेला पाचारण केलंय. एक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी ही माहिती दिली.

एक्सिस बँकेने निलंबित केलेल्या 19 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 6 जण हे दिल्लीच्या काश्मिरी गेट शाखेतील आहेत. नोटांची अवैध अदलाबदली करून नोटाबंदीच्या हेतूच्या हरताळ फासणाऱ्या कुणाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असंही बँक व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय.

सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने एक्सिस बँकेच्या काश्मिरी गेट शाखेतील दोन अधिकाऱ्यांना अटक केली होती. अधिकाऱ्यांच्या सहभागाने चलनातून बाद झालेल्या नोटांची अवैध बदली करण्याच्या रॅकेटमध्ये या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आलं होतं. या दोघांकडून तब्बल तीन किलो सोनंही जप्त करण्यात आलं होतं.

संबंधित बातमी : तब्बल 40 कोटींचा गैरव्यवहार, एक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना अटक