नवी दिल्ली : येत्या आर्थिक वर्षात आपला पगार किती टक्क्यांनी वाढणार, याची उत्सुकता प्रत्येक नोकरदाराला असते. विविध कंपन्यांमध्ये वर्षभराच्या कामकाजाचं मूल्यांकन सुरु असून 2018 मध्ये पगारवाढ होणार की नाही, आणि झालीच तर किती होणार, हा चर्चेचा विषय होता. 2018 मध्ये पगारवाढीचा दर 9.4 टक्के राहिल, असा अंदाज प्रसिद्ध ग्लोबल प्रोफेशन सर्व्हिस कंपनी एऑनने व्यक्त केला आहे.


सर्वोत्तम काम करणाऱ्याला 15.4 टक्के पगारवाढ असू शकेल. अॅव्हरेज परफॉर्मर नोकरदाराच्या तुलनेत टॉप परफॉर्मरला 1.9 पट जास्त पगारवाढ मिळेल. 20 औद्योगिक क्षेत्रांतील एक हजारापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही अंदाज बांधण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉप परफॉर्मर्सच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे.

व्यावसायिक सेवा, कंझ्युमर इंटरनेट, जैवविज्ञान, ऑटोमोटिव्ह, ग्राहक उत्पादन या क्षेत्रांशी निगडीत कंपन्यांमध्ये पगारवाढीचा सरासरी दर दुहेरी आकड्यांमध्ये असेल, असा अंदाज आहे. आयटी क्षेत्रात हा दर 9.5 टक्के राहील. देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या थर्ड पार्टी आयटी सर्व्हिसेसमध्ये पगारवाढीचा सरासरी दर 6.2 टक्के असेल, असा अंदाज बांधला जात आहे.

क्षेत्र- पगारवाढीचा सरासरी दर

व्यावसायिक सेवा - 10.6
कंझ्युमर इंटरनेट - 10.4
जैवविज्ञान - 10.3
ग्राहक उत्पादन - 10.2
ऑटोमोटिव्ह/ऑटोमोबाईल - 10.1
केमिकल्स - 9.6
रिटेल - 9.5
आयटी - 9.5
रिअल इस्टेट/ इन्फ्रास्ट्रक्चर - 9.3
इंजिनिअरिंग/मॅन्युफॅक्चर - 9.2
मेटल्स - 9.2
टेलिकम्युनिकेशन - 9.1
मनोरंजन/कम्युनिकेशन - 9.1
हॉस्पिटल/रेस्टॉरंट - 9
ऊर्जा - 9
वाहतूक - 9
इंजिनिअरिंग सेवा - 8.9
आर्थिक सेवा - 8.5
सिमेंट - 8.4