Autorickshaw Garden : दिल्लीच्या रस्त्यावर अनेक पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या ऑटो रिक्षा धावत असताना एका ऑटोरिक्षाने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आॅटोचालक महेंद्र कुमार यांनी 'आउट ऑफ द बॉक्स' जाऊन हा नावीण्यपूर्ण प्रयोग सुरु केला आहे.    शहरात उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना थंडावा देण्यासाठी ऑटोरिक्षाचालकाने चक्क रिक्षाच्या छतावर फुलझाडांची बाग तयार केली आहे.  


शहरातील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावरही ऑटोच्या वरच्या बाजूला असलेला दाट हिरवा पॅच थंड ठेवतो. या पॅचमध्ये 20 हून अधिक प्रकारची झाडे आहेत. ही ऑटोरिक्षा प्रवाशांना तसेच नागरिकांना इतकी आकर्षित करतेय की प्रत्येकाला या ऑटोरिक्षाबरोबर सेल्फी काढण्याचा मोह होतोय.  


महेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या ऋतूत ही कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी ही कल्पना सत्यात उतरवली. 


महेंद्र कुमार यांनी फक्त उष्णतेवर मात करण्यासाठी झाडेच नाही तर ऑटो रिक्षात 2 मिनी कुलर आणि पंखेही बसवले आहेत. 48 वर्षीय महेंद्र कुमार म्हणाले की, "हे आता नैसर्गिक एसी (एअर कंडिशनर) सारखे आहे. माझे प्रवासी राईडनंतर इतके आनंदी आहेत की मला भाड्याव्यतिरिक्त वरचे 10-20 रुपये देण्यासही त्यांची काही हरकत नसते."


देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट सुरू असताना, कुमार म्हणाले की ते त्यांच्या ऑटो रिक्षावर कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला आणि त्याचे झाड, टोमॅटो आणि बाजरी लागवड करून पर्यावरणासाठी छोटंसं योगदान देत आहेत. पेरणीसाठी ऑटोरिक्षाचे छत तयार करताना कुमार यांनी सर्वात आधी त्यावर चटई घातली. नंतर एक जाड पोती टाकली ज्यावर थोडी माती टाकली. मग रस्त्याच्या कडेला गवत आणि लोकांकडून बियाणे मागवले. काही दिवसांतच बिया उगवून त्यांना कोंब फुटले. यासाठी दिवसातून 2 वेळा कुमार झाडांना पाणी देतात. कुमार यांच्या अनोख्या प्रयोगाने अल्पावधीतच लोकांची मनं जिंकली आहेत. 


महत्वाच्या बातम्या :