नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून ‘देशाची दशा आणि दिशा’ यावर संबोधन केलं. भारताच्या लोकशाहीचं कौतुक करत, सत्ताधारी आण विरोधकांनी सोबत येऊन काम केल्याचंही नमूद केलं.   


 

राष्ट्रपतींनी जीएसटी विधेयकाच्या मंजुरीचा उल्लेख केला. यावेळी राष्ट्रपती म्हणाले, जीएसटी विधेयक मंजूर होणं म्हणजे देशात एकी असल्याचे दिसते.

 

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील घटनेचा दाखल देत राष्ट्रपती म्हणाले, महिला आणि चिमुरड्यांवरील अत्याचार म्हणजे देशाच्या सभ्येतेवर हल्ला आहे.

 

गरीब आणि मागासवर्गीयांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात लढणं गरजेचं आहे. देशात कुणा एका व्यक्ती किंवा संस्थेचे कायदे चालणार नाहीत, असं ठणकावत राष्ट्रपतींनी गोरक्षेच्या नावावरुन हल्ले करणाऱ्यांची कानउघडणी केली.

 

सर्वांनी सोबत चालावं, हा संदेश आपल्या घटनेतच आहे, त्यामुळे सर्वांची एकमेकांच्या भावनांचा आदर करावा, असं आवाहान राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून केलं.