Attack on Army post in Jammu's Doda : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांने आणखी एक हल्ला केला. रियासी आणि कठुआ येथील हल्ल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका ठिकणी दहशतवाद्यानं हल्ला केला. डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरता ऑपरेटिंग बेसवर (टीओबी) गोळीबार केला. भारतीय सैन्याकडूनही दहशतवाद्याच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आली. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली. दहशतवाद्याच्या गोळीबारात एक स्थानिक व्यक्ती जखमी झाला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल जोरदार गोळीबार करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. जम्मू काश्मीर पोलिसांनी याबाबत मंगळवारी रात्री उशीरा माहिती दिली. 


जम्मूचे एडीजीपी आनंद जैन यांनी या हल्ल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, "दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झालाय. दहशतवाद्याच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दहशतवाद्याविरोधीत ऑपरेशन अद्याप सुरु आहे, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर आहेत."


तीन दिवसांत तीन हल्ले -  


जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. कधी नागरिक तर कधी लष्कराच्या बेसवरच हल्ला केला जातोय. मागील तीन दिवसांत दहशतवाद्यांकडून तीन हल्ले करण्यात आले आहेत. रियासीमध्ये दहशतवाद्यांनी प्रवासी बसवर गोळीबार केला होता, यामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला होता. लष्करांकडून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याविरोधात विशेष मोहिम राबवली जात आहे. 






दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर हल्ला - 


जम्मू-कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. भारतीय जवानाच्या प्रतिहल्ल्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. या हल्ल्याच्या काही तासांनंतरच डोडा येथील सैनिकांच्या बेसवर दहशतवद्यांनी हल्ला केला. भारतीय जवानानंनी प्रत्युत्तरदाखल गोळीबार केला. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झालाय. भारतीय लष्कराकडून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.