IAS Athar Amir Khan : श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि आयएएस (IAS) टीना दाबी (Tina Dabi) यांचे पूर्व पती आयएएस अतहर आमिर खान (IAS Athar Amir Khan) पुन्हा विवाहबंधनात अडकले आहे. आमिरने डॉ. महरीन काजी (Dr. Mehreen Qazi) यांच्याशी विवाह केला आहे. लग्नानंतर अतहर यांनी आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अतहर आणि महरीन यांचा साखरपुडा जुलै महिन्यात झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत कायमच चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान 1 ऑक्टोबरला दोघेहे विवाहबंधनात अडकले. अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत अतहर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर महरीन काजी लेहंग्यामध्ये दिसत आहे. महरीन यांनी आपल्या हातावर उर्दू भाषेत अतहरचे नाव लिहिले असून त्याचा फोटो स्वत: शेअर केला आहे.
डॉक्टर मेहरीन काजी (Dr Mehreen Qazi) या श्रीनगरमधील आहेत. महरीन काजी या राजीव गांधी कन्सर संस्थान आणि अनुसंधान केंद्रात कार्यरत आहे. फक्त मेडिकल क्षेत्रात नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील त्य सक्रिय आहेत. मीडिया रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, अतहर आणि महरीन अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. महरीन यांनी यूके आणि जर्मनीत आपले वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले आहे. महरीन यांचे इन्स्टाग्रामवर साडे तीन लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
अतहर आमिर खानचं पहिलं लग्न आयएएस टॉपर टीना दाबीसोबत झालं होतं. याचं लग्न बरंच चर्चेत राहिलं पण, हे जास्त काळ टिकू शकलं नाही. नंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतन टीना दाबीनं आयएएय प्रदी गावंडेसोबत लग्न केलं. दिल्लीच्या टीना दाबी यांनी 2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता. तर जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेल्या अतहर आमीरने त्याच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. या दोन्ही टॉपर्सना राजस्थान केडर मिळाले आणि 2018 साली त्यांनी लग्न केलं. केवळ दोन वर्षातच हे दोन तरुण आयएएस अधिकारी देशभरात चर्चेत आले होते.
संबंधित बातम्या :
Tina Dabi : IAS टीना दाबी झाल्या महाराष्ट्राची सून, IAS प्रदीप गावंडेंसोबत विवाहबंधनात
Athar Aamir Khan : टीना दाबीचा घटस्फोटीत पती, आयएएस अतहर खानची सोशल मीडियावर हवा