Assembly Election 2023 Date: ईशान्येतील तीन राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. बुधवारी म्हणजेच, आज निवडणूक आयोग मेघालय (Meghalaya), त्रिपुरा (Tripura) आणि नागालँडमधील (Nagaland) विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election Updates) तारखा जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या अधिसूचनेबाबत सविस्तर माहिती देणार आहे. 


मेघालय विधानसभेत भाजपची (BJP) स्थितीही विशेष नाही. विधानसभेच्या 60 जागा असलेल्या मेघालयमध्ये भाजपकडे केवळ 2 जागा आहेत, तर केवळ 9.6 टक्के वोट शेअर आहे. दुसरीकडे लोकसभेच्या जागांबाबत बोलायचं झालं तर राज्यात लोकसभेच्या एकूण दोन जागा आहेत आणि त्या दोन्हीही भाजपकडे नाहीत. येथे एक जागा काँग्रेसकडे आणि एक जागा एनपीपीकडे (नॅशनल पीपल्स पार्टी) आहे.


नागालँडपेक्षा त्रिपुरात भाजपचं वर्चस्व 


ईशान्येतील आणखी एक राज्य नागालँडमध्ये भाजपची राजकीय स्थिती फारशी खास नाही. येथे भाजपकडे 15.3 टक्के मतांसह 60 पैकी केवळ 12 जागा आहेत. मात्र, त्रिपुरामध्ये भाजपची स्थिती खूपच चांगली आहे. येथे लोकसभेच्या दोन जागा असून भाजपकडे दोन्ही आहेत. त्याचबरोबर विधानसभेतही भाजपचं बहुमत आहे. 60 पैकी 36 जागा भाजपच्या ताब्यात आहेत.


तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण? 



  • नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीचे नेता नेफियू रियो नागालँडचे मुख्यमंत्री आहेत.

  • भाजप नेते माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. 

  • एनपीपीचे कॉनराड संगमा मेघायलचे मुख्यमंत्री आहेत. 


या वर्षी कोणत्या राज्यांमध्ये निवडणुका? 



  • छत्तीसगड (Chhattisgarh)

  • कर्नाटक (Karnataka)

  • मेघालय (Meghalaya)

  • नागालँड (Nagaland)

  • त्रिपुरा (Tripura)

  • मध्यप्रदेश (Madhya Pradesh)

  • मिझोरम (Mizoram)

  • राजस्थान (Rajasthan)

  • तेलंगाणा (Telangana)