नवी दिल्ली : पत्रकारिता सोडून राजकारणात आलेल्या आशुतोष यांनी आम आदमी पक्षाला रामराम केला आहे. आशुतोष यांनी ट्विटरवरुल आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.

आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये, “ प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो, आम आदमी पक्षाबरोबर असलेला सुंदर आणि क्रांतिकारक प्रवास आज इथेच संपला आहे. मी माझा राजीनामा स्वीकार करण्याची विनंती पक्षाच्या राजकीय कामकाज समितीला केलीयं.” तर मी वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा देत असल्याचे आशुतोष यांनी स्पष्ट केले. तसेच आशुतोष यांनी ट्विटवरुन आपल्या समर्थकांचे आभार मानले आहेत.


काही दिवसांपासून आशुतोष यांचे पक्षनेतृत्वाबरोबर मतभेद निर्माण झाले होते. तसेच काही दिवसांपासून आशुतोष पक्षामध्ये सक्रिय नव्हते. तसेच पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा वेळोवेळी बचाव करणारे आशुतोष सोशल मीडियावर शांत असल्याचे दिसून आले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत आदमी पक्षाच्या तिकिटावर दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याविरोधात एक लाख मतांनी पराभूत झाले होते.