Bharat Jodo Yatra COVID Protocol: जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. त्यामुळं भारत सरकारनं सावध पवित्रा घेतलाय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहित भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)  थांबवण्याचं आवाहन केले आहे. यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेला मोदी सरकार घाबरल्याचे वक्तव्य गेहलोत यांनी केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहावं असा पलटवार अशोक गेहलोत यांनी केला आहे.


नेमकं काय म्हणाले अशोक गेहलोत 


राजस्थानमधील भारत जोडो यात्रा 21 डिसेंबरला सकाळी पूर्ण झाली आहे. परंतू भाजप आणि मोदी सरकार भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं घाबरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील मांडवीय आपल्या पत्रात म्हटले आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की वाढत्या जनसमर्थनाच्या भीतीनं भारत जोडो यात्रेला अडथळा आणण्याचा भाजपचा हेतू असल्याचे गेहलोत म्हणाले.


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पहिलं पंतप्रधानांना पत्र लिहावं


अशोक गेहलोत  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा संदर्भ दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये रॅली काढली होती. तिथे कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले नसल्याचे गेहलोत म्हणाले. कोविडच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधानांनी बंगालमध्ये मोठ्या प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा उद्देश राजकीय नसेल, त्यांना कोरोनाची चिंता असेल, तर त्यांनी पहिले पंतप्रधानांना पत्र लिहायला हवे असेही गेहलोत म्हणाले.


आरोग्यमंत्र्यांच्या पत्रानंतर काँग्रेसची सरकारवर जोरदार टीका  


आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारत जोडो यात्रेनं भाजपला हादरा दिला आहे. हे सर्व लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केले जात असल्याचे चौधरी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Coronavirus : नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राहुल गांधींना पत्र