हैदराबाद : सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्या निकालावर दिली आहे. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा निकाल देत, मुस्लीम समाजाला मशिद बांधण्यासाठी पर्यायी 5 एकर जमीन देण्याचाही आदेश दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाले खासदार असदुद्दीन ओवेसी
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डही या निर्णयावर नाराज आहे, माझेही तेच मत आहे. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही, त्यांच्याही चुका होऊ शकतात. ज्यांनी बाबरी मशिदीला पाडले, त्यांनाच ट्रस्ट तयार करुन मंदिर निर्माणाचे अधिकार कोर्टाने दिला आहे. जर मशिद अस्तित्वात असती तर कोर्टाचा निर्णय काय असता? असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला.
आम्ही आमच्या कायदेशीर अधिकारासाठी लढत होतो. त्यामुळे आम्हाला 5 एकरची भीक नको. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनी ही ऑफर नाकारावी. आपला देशाचा हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात आहे. संघ, भाजप आणि हिंदूत्ववादी लोक याची सुरुवात अयोध्येतून करतील. त्यामुळे या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. त्याठिकाणी मशिद होती, आहे आणि पुढेही राहिल.
संबंधित बातम्या -
ऐतिहासिक निकाल, संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा
Ayodhya Verdict : निकालाचा सन्मान, मात्र समाधान नाही : सुन्नी वक्फ बोर्ड
अयोध्येचा निकाल एकमताने; ऐतिहासिक निर्णय देणारे ५ न्यायमूर्ती
#AyodhyaVerdict: बॉलिवूडकरांचे भारतीयांना आवाहन; आपण एक होतो एकच राहू
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही; 5 एकरची भीक नको - ओवेसी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2019 02:40 PM (IST)
सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -