नवी दिल्ली: एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमरनाथ हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसंच या प्रसंगी कोणत्याही राजकीय पक्षानं यावर राजकरण करु नये. असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच या हल्ल्याला केंद्र सरकारनं चोख प्रत्युत्तर द्यावं असंही ते यावेळी म्हणाले.

'या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे. पण आम्ही भारतात लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयला कधीही यशस्वी होऊ देणार नाही.' असं ओवेसी म्हणाले.

'दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकत्र आहे. या मुद्द्यावर राजकारण करु नये.' असंही ओवेसी म्हणाले.

'2002 सालीही अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ले झाले होते. आता भाजप सरकार सत्तेत असताना म्हणजेच तब्बल 15 वर्षांनी देखील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. आजही दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे.' असं म्हणत ओवेसींनी भाजपवर टीका केली.