योगी तु्म्ही अंगठा छाप आहात, जर सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते की निजाम पळून गेले नव्हते. ही भाषा योगींची नाही तर मोदींची आहे, असा प्रतिहल्ला ओवेसींनी चढवला.
भारत माझा आहे
भारतात माझ्या वडिलांनी जन्म घेतला. त्यामुळे भारत माझा आहे, कुणीही आम्हाला पळवून लाऊ शकत नाही. योगींनी उत्तर प्रदेशाची काळजी करावी. तेलंगणाची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, असे ओवेसी म्हणाले. ऑक्सिजनअभावी उत्तर प्रदेशातील लहान मुलं बळी पडत आहेत. त्य़ाकडे योगींनी लक्ष द्यावं असं टीकास्त्रही ओवेसींनी सोडले.
योगी अंगठा छाप
निजाम पळून गेले होते, या योगींच्या या वक्तव्यावर बोलताना ओवेसी म्हणाले की, "योगी तुम्ही अंगठा छाप आहात. तुमचा इतिहासाचा अभ्यास खूप कच्चा आहे. तुम्ही जर सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते, की निजाम हैदराबाद सोडून पळून गेले नव्हते. तर निजाम मीर उस्मान अली खान यांना भारत सरकारने राज्यपाल केले होते. जेव्हा चीनसोबत युद्ध झाले, त्यावेळी निजामांनी देशाला सोने दान केले होते, आणि तुम्ही म्हणता निजाम पळून गेले होते. हे तुमची नव्हे, तर मोदींची भाषा आहे."
काय म्हणाले होते योगी ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणा निवडणुकीच्या प्रचारात ओवेसींनी हल्लाबोल केला होता. तेलंगणात जर भाजपची सत्ता आली तर निजामांसारख ओवेसींनाही पळवून लावू, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते. योग आदित्यनाथ यांनी 7 ते 10 वाजता माझ्या सभेतील भाषण ऐकावे, असा ट्वीट असदुद्दीन ओवेसींनी योगींच्या वक्तव्यानंतर केले होते.
संबंधित बातम्या