नवी दिल्ली : बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टाच्या निर्णयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओवैसी यांनी एक शायरी ट्वीट करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.


असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर ट्वीट केलं की, 'वही कातिल वही मुनसिफ अदालत उसकी वो शाहिद, बहुत से फैसलों में अब तरफदारी भी होती है.'





हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'सीबीआय कोर्टाचा निर्णय म्हणजे, भारतीय न्यायालयाच्या तारखेचा काळा दिवस आहे. जादूने मशीद गायब केली होती का? जादू करून मुर्ती ठेवल्या होत्या का? जादूने टाळे उघडण्यात आले? सुप्रीम कोर्टाने जो 9 नोव्हेंबर रोजी निर्णय दिला होता, आजचा निर्णय त्याविरोधात आहे. तुम्ही अंदाज लावा अडवाणींची रथयात्रा जिथे-जिथे गेली, तिथे-तिथे हिंसा झाली. लोकांची घरं जाळण्यात आली.' तसेच ते म्हणाले की, 'काय हे खरं नाही का? की उमा भारती म्हणाल्या होत्या की, एक धक्का आणखी द्या, बाबरी मशीद तोडा. काय जेव्हा बाबरी विध्वंस झाला त्यावेळी उमा भारती, अडवाणी मिठाई खात नव्हते?'


पाहा व्हिडीओ : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष



दरम्यान, 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर देशाच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या या प्रकरणाचा निकाल आज न्यायालयाने दिला.


बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल आल्यावर लालकृष्ण आडवाणींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...


या आरोपींची निर्दोष मुक्तता


लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर


या निकालानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे. मुंबई भाजप कार्यालयात देखील जल्लोष केला आहे. तसंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष