नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. केजरीवालांनी यावेळी नोटा नाही तर पंतप्रधान बदला, असं म्हटलं आहे.

नोटाबंदीमुळे पेटीएमचाच जास्त फायदा झाला आहे. मोदी आणि पेटीएमचा काय संबंध आहे, याचा खुलासा करण्याची मागणी केजरीवालांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/800644378704297984

केजरीवालांनी यापूर्वी देखील मोदींवर नोटाबंदीवरुन टीका केली होती. नोटाबंदी म्हणजे आठ लाख कोटींचा घोटाळा आहे, असं विधान त्यांनी केलं होतं.

दरम्यान ट्विटरवरुन केजरीवालांनी नोटा नाही, पंतप्रधान बदला हे विधान केल्यानंतर ट्विपल्सकडून त्यांची खिल्लीही उडवण्यात आली. पीएम नाही तर दिल्लीचे सीएम बदला, असं म्हणत सोशल मीडियावर केजरीवालांच्या विधानावर टिप्पणी करण्यात आली.