लखनौ : आग्रा आणि लखनौला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या महामार्गाचं आज उद्घाटन झालं. भारतीय हवाई दलाच्या आठ लढाऊ विमानांनी या महामार्गावर लँडिंग केलं. हवाई दलाच्या 4 सुखोई आणि 4 मिराज विमानांचा समावेश होता.


महामार्गाच्या उद्घाटनाला विमानांचा सहभाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुखोई विमानांनी बरेलीहून तर मिराज विमानांनी ग्वाल्हेरहून टेकऑफ करुन महामार्गावर लँडिंग केलं.

उद्घाटनानंतर आग्रा-लखनौ महामार्ग सामान्यांसाठी खुला होईल. सुमारे 302 किमी लांबीच्या या हायवेच्या निर्मितीला 15000 कोटी खर्च करण्यात आले आहेत. अवघ्या 23 महिन्यात हा हायवे बनवण्यात आला आहे.

एक्स्प्रेस वेवर फायटर जेट उतरण्यासाठी शुक्रवारी ट्रायल झालं होतं. आपत्कालीन परिस्थितीत एअर फील्ड रिकामे नसल्यास देशातील महामार्गांना धावपट्टीयोग्य बनवण्यासाठीचे हे प्रयत्न असल्याचा सुरक्षा मंत्रालयाचा प्लॅन आहे.