नवी दिल्ली : लघु उद्योग आणि लहान व्यापाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 40 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे उद्योग आणि व्यापाऱ्यांना जीएसटीतून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी 20 लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ही सूट देण्यात आली होती.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत नवे निर्णय घेण्यात आला आहेत. जीएसटी परिषदेची ही ३२ वी बैठक होती.

लहान व्यावसायिकांना आता कॉम्पोझिशन स्किमचा फायदा घेता येणार आहे. तसेच त्याची मर्यादा वाढवून दीड कोटी करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी लोकांना आता दर तीन महिन्याला कर भरावा लागणार आहे. याचबरोबर सेवा पुरवठादार कंपन्यांनाही या कम्पोझिशन स्कीममध्ये घेण्यास आजच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी नोंदणीतूनही सूट मिळणार आहे. दरम्यान, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजच्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.