जेटलींपाठोपाठ महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे 3.41 किलो सोन्याचे दागिने आणि 85 किलो चांदी आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मात्र साडेचार तोळ्याच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.
कॅबिनेट मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि नजमा हेप्तुल्ला यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला नाही. जेटली यांच्याकडे स्वत:चे सर्वाधिक सोन्याचे दागिने आहेत.
जेटली यांनी 5 किलो 630 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा प्रतिग्रॅम 2409 रुपये दरानुसार या दागिन्यांची 1 कोटी 35 लाख 62 हजार रुपये किंमत दाखवली आहे. पत्नी संगीता जेटली यांच्याकडे सुमारे 80 तोळ्यांचे दागिने, चार किलो चांदी आणि 23 लाखांचे हिरे आहेत.
इतर कॅबिनेट मंत्र्यांकडील दागिने
जलसंपदा मंत्री उमा भारती : सोने-चांदीची भांडी, देवाचे दागिने मिळून सहा किलो वजनाचे सोने-चांदी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू : यांच्याकडे 225 ग्रॅम सोन्याची नाणी
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान : पत्नीकडे 70 तोळे सोनं
रसायनमंत्री अनंतकुमार : पत्नीकडे 80 तोळे सोने आणि 10 किलो चांदी
मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाच लाख 68 हजारांचे, तर पत्नीकडे 15 लाखांचे दागिने
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज : सोने, चांदीचे मिळून 30 लाखांचे दागिने
वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी : यांच्याकडे 16.350 ग्रॅम वजनाचे दागिने