नवी दिल्ली : संपूर्ण देशभर आज 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छांसह रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांसह कलम 370 च्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की, आमचं सरकार समस्या बाळगत नाही आणि टाळतही नाही. कलम 370 ची समस्या गेल्या 70 वर्षांमध्ये सोडवली नव्हती. परंतु आमच्या सरकारने अवघ्या 70 दिवसांमध्ये ती समस्या सोडवली आहे.
मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश मतांच्या फरकाने कलम 370 रद्द करण्याचे विधेयक पारित केले. याचाच अर्थ कलम 370 रद्द करावे ही सर्वांचीच इच्छा होती.
कलम 370 रद्द करण्याची गरज होती, परंतु प्रश्न होता की, त्यासाठी पुढे कोण येणार? तुम्ही (जनतेने) ती जबाबदारी आमच्या सरकारवर सोपवलीत. आम्ही ती कामगिरी पूर्ण केली. मुळात आम्ही त्यासाठीच सत्तेत आलो आहोत. जम्मू-काश्मीरमधल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण ती पूर्ण करु.
कलम 370 | जे 70 वर्षात झालं नाही, ते 70 दिवसात केलं : नरेंद्र मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2019 09:36 AM (IST)
संपूर्ण देशभर आज 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छांसह रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा दिल्या आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -