बंगळुरु : बंगळुरूत भारतीय लष्कराच्या जवानांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.  Army Service Corps एएससीच्या जवानांनी हा विक्रम रचला.


एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार झाले. 500 सीसीच्या रॉयल्ड इनफिल्डवर या जवानांनी 1200 मीटर राईडिंग केली.

तिरंग्यातील कपडे परिधान केलेल्या जवानांचं नेतृत्व मेजर बन्नी शर्मा यांनी केलं. तर सुभेदार रामपाल यादव या जवानाने बाईक चालवण्याची जबाबदारी लिलया पेलली.

या प्रात्यक्षिकासाठी भारतीय लष्करातील 58 जवान गेल्या अनेक महिन्यांपासून याची तयारी करत होते. विशेष म्हणजे, या प्रात्यक्षिकाच्या सरावादरम्यान हे जवान केवळ बिस्किटं आणि 100 मिली पाणी इतकाच आहार घेत होते.

दरम्यान, आज प्रात्यक्षिक सादर केलेल्या टीमने आजपर्यंत एक हजार शो सादर केले आहेत. तर या टीमच्या नावावर 20 विश्विविक्रम नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी याच टीममधील 56 जवानांनी एकाच बाईकवर स्वार होण्याचा विक्रम केला होता.

तर 1982 मध्ये याच टीमने एशियाड खेळात आपली चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करुन सर्वांचीच मनं जिंकली होती.

व्हिडीओ पाहा