मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. देशभरात लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पत्र लिहिलं आहे.

सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी मोदी सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. अद्याप सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी निश्चित असा कायदा करण्यात आलेला नाही. अशा शब्दात अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

अण्णा हजारेंचं मोदींना पत्र

''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली, तरीही उत्तर नाही''

''तुमच्या करण्यात आणि बोलण्यात अंतर''

''देशाच्या भल्यासाठी पुन्हा आंदोलन''

''पुढच्या पत्रात आंदोलनाची तारीख आणि जागा निश्चित करणार''

संबंधित बातम्या :

विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट


… तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा