नवी दिल्ली : 'सहारा'चे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांना पुन्हा जेलची हवा खावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टानं सुब्रतो राय यांचा पॅरोल रद्द केल्याने राय यांना पुन्हा तिहार तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे.
सुब्रतो राय यांचा पॅरोल वाढवण्यासाठी वकिलांचा युक्तीवाद सुरु होता. त्यावेळी वकिलांच्या वागणुकीवर नाराजी दर्शवत सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे. सहाराच्या वतीनं वकील राजीव धवन यांनी युक्तीवाद केला.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही सुब्रतो राय यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न वकील करत आहेत. त्यामुळे आज पुन्हा सुनावणीची शक्यता आहे. सुब्रतो राय यांच्यावर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे.