अहमदाबाद : रस्त्यानं निमूटपणे चालणारा बैल अचानकपणे हिंसक झाल्यावर काय होतं, हे अहमदाबादच्या एका रस्त्यावर पाहायला मिळालं. रस्त्यावरुन चालणाऱ्या एका महिलेला बैलानं चक्क हवेत भिरकावल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली आहे.

रस्त्यावरुन अतिशय शांतपणे हा बैल चालत जात होता. तो अचानक हिंसक होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र, काही वेळेतच समोरच्या महिलेला त्यानं जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पुन्हा तो बैल शांतपणे तिथून निघून गेला.

ही धडक इतकी जोरदार होती की, महिला हवेत तब्बल पाच ते सात फूट उंचावर फेकली गेली आणि काही अंतरावर रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. हा प्रकार पाहून आजुबाजूचे लोकही काही वेळासाठी घाबरले होते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

VIDEO :