Andhra Pradesh School Students Die By Suicide: आंध्रप्रदेशमधील (Andhra Pradesh) इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल नुकतच जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेतील अपयश सहन न झाल्यामुळे नऊ विद्यार्थांनी आत्महत्या (School Students Die By Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता 11 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे निकाल बुधवारी घोषित करण्यात आले होते. दरम्यान गुरूवारपर्यंत एकूण नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून इतर दोन विद्यार्थांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनं आंध्रप्रेदश राज्यातील जनता प्रचंड हादरली आहे.


या धक्कादायक घटनेत श्रीकाकुलम जिल्ह्यातील टेककलीजवळ 17 वर्षीय बी. तरूण या विद्यार्थांने चालत्या रेल्वेच्या समोर उडी मारून स्वत: चा जीव दिला. तर, याच जिल्ह्यातील दांदू गोपालपुरम गावची रहिवासी असणाऱ्या एका 11 वीच्या विद्यार्थांनीने नापास झाल्यामुळे प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. या 16 वर्षीय विद्यार्थांनीने विशाखापट्टणम जिल्ह्यातील त्रिनादपुरममध्ये स्वत: च्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली.  ए. अखिलकश्री या विद्यार्थिनी इयत्ता 11 वीच्या वर्गातील काही विषायमध्ये नापास झाल्यापासून प्रचंड चिंताग्रस्त होती. त्यामुळे तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलं उचलले आहे. या संपूर्ण घटनेनं आंध्रप्रेदश राज्यात प्रचंड हादरलं आहे.


 एका 17 वर्षीय विद्यार्थांने दरीत उडी मारून केली आत्महत्या 


आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमच्या कंचारपालेमच्या भागात राहणाऱ्या 18 वर्षीय बी. जगदिश या विद्यार्थांने स्वत:च्या घरामध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. या विद्यार्थ्याने 12 वीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्यामुळे आत्महत्या केली. दरम्यान आणखी एका धक्कादायक घटनेत नुकतच अकरावी शिकणारी 17 वर्षीय अनुषाने चित्तूर जिल्ह्यातील एका दरीत उडी मारून आत्महत्या केली. अनुषाने 11 वीच्या परीक्षेत एका विषयामध्ये नापास झाली होती. 


पासिंग सरासरी कमी असल्यामुळे केली आत्महत्या


चित्तोड जिल्हातील 17 वर्षीय बाबू या विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. 17 वर्षीय ली. टी. किरण या विद्यार्थाने अनकापल्ली येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याच कारण 11 वी मध्ये कमी गुण प्राप्त झाल्यामुळे तो निराश होता.  दरम्यान, इयत्ता  11 वी आणि इयत्ता 12 वीमध्ये अनुक्रमे 61 टक्के आणि 72 टक्के गुण प्राप्त करूनही बाबूने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले आहे. ही बोर्ड परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी राज्यातील एकूण 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. या घटनेमुळे समुपदेशक आणि पोलिस प्रशासनाने विद्यार्थांना आव्हान केलं आहे की, विद्यार्थांनी कोणतंही टोकाचं पाऊल न उचलत नये. कारण, समोर इतकं आयुष्य पडल असून ते अपयशाला यशात रूपांतरित करू शकतात.