Andhra Pradesh new Cabinet : आंध्र प्रदेशमध्ये आज जगनमोहन रेड्डी यांच्या नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. आज 25 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळातील सर्व 24 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले होते. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळाचा आज शपथविधी सोहळा संपन्न झाला. मात्र यावेळचा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजभवनात झाला नाही तो सोहळा सचिवालयात झाला.
मंत्रिपरिषदेच्या प्रस्तावित पुनर्रचनेपूर्वी राज्यातील सर्व 24 मंत्र्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले होते. काही दिवसांपूर्वी आयटी मंत्री गौतम रेड्डी यांचे निधन झाले होते. त्यांच्यासहीत 25 मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यमान मंत्र्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्याकडे राजीनामे दिले होते. दरम्यान, सर्व मंत्री एकूण 34 महिने त्यांच्या पदावर कायम राहिले. दरम्यान 2024 मध्ये आगामी राज्य निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून हे स्वागतार्ह पाऊल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शुक्रवारी दुपारी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक संपल्यानंतर सर्व 24 कॅबिनेट मंत्र्यांनी गुरुवारी आंध्र प्रदेश सचिवालयात मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे सादर केले होते.
मागच्या मंत्रीमंडळातील 24 मंत्र्यांपैकी 11 मंत्र्यांना पुन्हा मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. तर 14 नवीन चेहऱ्यांना जगनमोहन रेड्डी यांनी संधी दिली आहे. हा मंत्रीमंडळाचा विस्तार 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय. मात्र, या राजीनामा नाट्यामुळे आंध्र प्रदेशच्या मंत्रीमंडळात नाराजीचे वातावरण पसरले आहे. कारण ज्या राजीनामा दिलेल्या नेत्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नाही ते नाराज असल्याचे बोलले जात आहेत. नाराज नेत्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी समर्थकांनी तीव्र आंदोलनही केले. काही ठिकाणी टायर जाळले तर काही ठिकाणी रस्ते अडवल्याचे प्रकार घडले.
दरम्यान, 30 मे 2019 ला जनगमोहन रेड्डी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळीच त्यांनी अडीच वर्षानंतर मंत्रीमंडळात बदल केले जातील असे सांगतिले होते. त्याप्रमाणे त्यांनी मंत्रीमंडळात आज बदल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: