Anantnag Encounter News: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये (Anantnag) सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी उझैर खान याला ठार केलं आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला. एका मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यासाठीची शोध मोहीम अनंतनागमध्ये अद्याप सुरूच आहे. अनंतनागमधील चकमकीत चार जवानही शहीद झाले आहेत.


अनंतनागमधील चकमक थांबली, शोधमोहीम सुरू


सध्या अनंतनागमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. आता सुरक्षा दलांनी फक्त शोध मोहिमेवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे, याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा झाला असता तरी त्यांच्याशी संबंधित गोष्टी तिथे आढळू शकतात. अनंतनागमधील नुकत्याच झालेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून चार जवान शहीद झाले आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेहाचाही लष्कर शोध घेत आहे. सध्या लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. लष्कराचे जवान जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.


तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेहाचा शोध सुरू


एडीजीपी विजय कुमार यांनी मंगळवारी अनंतनाग ऑपरेशनबाबत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शोध मोहीम सुरूच राहणार आहे कारण अनेक भाग शिल्लक आहेत. आम्ही लोकांना त्या भागात न जाण्याचं आवाहन करतो. आम्हाला दोन ते तीन दहशतवाद्यांची माहिती होती.' ते पुढे म्हणाले, 'आम्हाला तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेहही कुठेतरी सापडण्याची शक्यता आहे. या कारणास्तव आम्ही शोध मोहीम सुरू ठेवणार आहोत.'






अनंतनागमधील चकमक संपली


एडीजीपी विजय कुमार म्हणाले, 'आम्हाला लष्कर-ए-तोएबाच्या कमांडरचा मृतदेह सापडला असून हा मृतदेह आम्ही आमच्या ताब्यात घेतला आहे. आम्हाला आणखी मृतदेह सापडू शकतो, त्यामुळे त्याच तिसऱ्या मृतदेहाचा शोध सध्या सुरू आहे. वास्तविक, आठवडाभरापासून सुरू असलेली ही चकमक आता संपुष्टात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग कोकरनम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस अनंतनागमध्ये पोहोचले होते.'


हेही वाचा:


Jammu and Kashmir : काश्मीरमधील अनंतनागमध्ये सर्वात मोठी चकमक, सहा दिवसात डीएसपीसह 5 जवान शहीद; सहा दहशतवाद्यांचा खात्मा