नवी दिल्ली: भारतीय चित्रपटातगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे, अशी मागणी पुन्हा जोर धरत असून आता या मागणीला महानायक अमिताभ बच्चन यांनीही समर्थन दिले आहे. अमिताभ बच्चन यांचा 'पिंक' हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमिताभ आणि चित्रपट निर्मते शूजित सरकार दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली.


बॉलिवूडमध्ये 'लव डे' या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता हर्ष नायरने एक पत्रक काढून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीही या मागणीला समर्थन दिले.

अमिताभ म्हणाले की, ''शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात जात असू, त्यावेळी चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावले जात असे. मुंबईतही जेव्हा एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट रिलीजच्या वेळी जातो, तेव्हा राष्ट्रगीत सुरु केल्यानंतर मोठा अभिमान वाटतो. आताही ही परंपरा सुरुच ठेवली तर चांगली गोष्ट आहे,'' असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शूजित सरकार यांनीही याचे समर्थन केले असून जर चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु केले तर, मोठी आनंदाची गोष्ट असेल, असे म्हणले आहे.

हर्षने पंतप्रधान नरेंद्र मोंदींशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा, आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही ही मागणी केली आहे.

संबंधित बातम्या


चित्रपटगृहात प्राईम टाईमला मराठी सिनेमा दाखवणं अनिवार्य!


सूर्यास्तानंतर थिएटर्समध्ये राष्ट्रगीत बंद, नगरसेविकेच्या तक्रारीनंतर चंद्रपुरात कलेक्टरांचा आदेश


राष्ट्रगीतापूर्वी थिएटरमध्ये दादासाहेब फाळकेंची चित्रफीत