नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याचा कोविड 19 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांना त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. दरम्यान राहुल गांधी यांनीही ट्वीट अमित शाह यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो."
अमित शाह यांचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याआधी अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."
Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचं ट्वीट
भाजप अध्यक्ष जेपी यांनीही ट्वीट करत म्हटलं की, माननीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो.