Amit Shah On CAA : गुजरात निवडणुकीदरम्यान (Gujarat Election 2022) एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी CAA बाबत मोठे वक्तव्य केले आहे. एका खासगी वृत्तपत्राच्या पत्रकारासोबत बोलताना अमित शाह म्हणाले की, जे CAA लागू न होण्याचे स्वप्न पाहत आहेत ते चूक करत आहेत. कारण CAA हे या देशाचे वास्तव आणि कायदा आहे. ते म्हणाले की, हा कायदा लवकरच लागू होईल, कोरोनामुळे याला विलंब होत आहे, आम्हाला फक्त काही नियम बनवायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.


CAA या देशाचे वास्तव आणि कायदा


मुलाखतीत जेव्हा अमित शहांना NRC आणि CAA बद्दल विचारले होते, तेव्हा ते म्हणाले की काहीही होल्डवर नाही. CAA हा देशाचा कायदा आहे. आता यात कोणताही बदल होऊ शकत नाही. आपल्याला नियम बनवावे लागतील. कोविड आता संपुष्टात आला आहे. आज मी निश्चितपणे म्हणू शकतो की, CAA लागू होणार नाही, हे स्वप्न पाहणारे चूक करत आहेत. CAA हे या देशाचे वास्तव आणि कायदा आहे.


''सावरकरांवर भाष्य करणाऱ्यांनी 10 दिवस त्या तुरुंगात राहावे'' - अमित शाह 
याशिवाय या मुलाखतीत अमित शाह यांनी वीर सावरकर वादग्रस्त मुद्द्यासंदर्भात सांगितले की, जे त्यांच्यावर भाष्य करत आहेत त्यांनी 10 दिवस त्या तुरुंगात राहावे, जिथे वीर सावरकर 10 वर्षे राहिले आहेत. तसा कोणी वीर सावरकर नाही. वीर सावरकरांचा अर्थ समजून घेतला तर हा मुद्दा निकाली निघेल. शाह म्हणाले की, सावरकरांवर अशी भडक टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे लोक जनतेसमोर गेल्यावर जनता त्यांना सांगेल. 


''चीनसोबतचा सीमावाद खूप जुना'' 
चीनबाबत अमित शाह म्हणाले की, चीनसोबतचा सीमावाद खूप जुना आहे. जे आज प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्या काळात चीनमध्ये एक लाख एकरहून अधिक जमीन गेली, त्यांनी इतिहास वाचावा. आमच्या सरकारचा विचार केला तर, आम्ही ठाम आहोत की एक इंचही जमीन परकीय देशाच्या ताब्यात जाऊ शकत नाही.



काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा?


या कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.याआधी भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक होतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Amit Shah on Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य