मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज (सोमवार) राहुल गांधींवर निशाणा साधला. अमेरिकेतील भाषणात घराणेशाहीचं अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या राहुल गांधींवर अमित शाहंनी जोरदार टीका केली.
‘आमचा पक्ष कामगिरीवर लक्ष केंद्रीत करतो तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे.’ अशा शब्दात अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या कामामुळे सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. भाजपमध्ये कामगिरीला प्राधान्य दिले जाते. मात्र, काँग्रेसमध्ये घराणेशाहीला झुकते माप दिले जाते,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला.
अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी घराणेशाहीचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं.
अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 11:18 PM (IST)
‘आमचा पक्ष कामगिरीवर लक्ष केंद्रीत करतो तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे.’ अशा शब्दात अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -