नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यात सोमवारी लोकसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळली. एनआयए कायद्यातल्या सुधारणांच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना या दोघांत खडाजंगी रंगली.

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक बळकटी देणाऱ्या सुधारणांवर भाजप खासदार सत्यपाल सिंहांचं भाषण लोकसभेत सुरु होतं. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी सत्यपाल सिंह यांच्या भाषणादरम्यान आक्षेप घेतला. त्यामुळं नाराज झालेले अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी खडेबोल ओवेसींना सुनावले. तर अमित शाह हे घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा सूर विरोधकांच्या बाकावरून ऐकायला मिळाला.


अमित शाह आणि ओवैसी यांच्यात नक्की काय झालं?

लोकसभेत सत्यपाल सिंह बोलत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी अडथळा आणला. त्यावेळी ओवेसी यांच्या बोलण्यावर नाराज होत गृह मंत्री अमित शाह आपल्या आसनावरुन उठून उभे राहत बोलण्यास सुरुवात केली. शाह यांनी जर प्रत्येकाने आपली वेळ आल्यावर बोलले तर ते चांगले होईल.

या शाब्दीक संघर्षाच्यावेळी दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विरोधी सदस्यांनी संयम बाळगला पाहिजे असे खडे बोल ओवेसींना सुनावले. तर ओवेसी साहब सुनने की भी आदत डालिए असेही अमित शाह म्हणाले. मी कोणाला घाबरवत नाहीय पण कोणाच्या मनात भिती असेल तर मी काही करु शकत नाही असे अमित शाह ओवेसींना म्हणाले.

VIDEO | लोकसभेत चर्चेदरम्यान अमित शाह-असदुद्दीन ओवैसींमध्ये खडाजंगी | एबीपी माझा