देशातील 150 अशा जागा आहेत, जिथे भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असं अमित शाह यांनी बैठकीत सांगितलं. विशेष म्हणजे या जागांसाठी त्यांनी प्रझेंटेशनही दिलं आहे. या जागा निवडून आणण्यासाठी त्यावर पुढील दोन वर्षे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांविषयी मंत्र्यांकडून माहिती मागवली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत अनेक मंत्री सहभागी झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या 9 केंद्रीय मंत्री आणि 30 पक्ष पदाधिकाऱ्यांना आतापासूनच कामाला लागण्यास सांगितले आहे. यावेळी अमित शाह यांनी 10 मिनिटांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही सादर केलं. यामध्ये बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांचा विशेष उल्लेख केला गेला आहे.
भाजपने 2014 साली 300 जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. मात्र, भाजप 284 जागा जिंकू शकली. मात्र, मित्रपक्षांच्या जागा मिळवल्यास एनडीएच्या एकूण जागा 336 होतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह हे असे मानतात की, सध्या विरोधी पक्ष विखुरलेले आहेत. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मिशन 360 प्लस’ सहज शक्य आहे.