American Airlines Pee-gate Case:  अलीकडच्या काळात विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत.  विमानात सहप्रवाशाच्या अंगावर लघवी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. अमेरिकन एअरलाईन्सच्या न्यूयॉर्कहून  दिल्लीला येणाऱ्या  प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा (American airlines passenger On Board New York Delhi Flight Pees) प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे.


हा प्रकर अमेरिकन एअरलाईन्सच्या AA 292 या फ्लाईटमध्ये (Flight) घडली आहे. या प्रकरणी मद्यधुंद प्रवाशाला  सीआयएसएफने रविवारी रात्री 9 च्या सुमारास दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले. एअरलाईन्समधील कर्मचाऱ्यांनी य प्रकरणी  दिल्ली विमानतळ पोलिसांनी माहिती दिली होती. दिल्ली विमानतळावर पोहचताच दोन्ही प्रवाशांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीसार, पीडित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी नागरिक उड्डान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशाच्या असभ्य वर्तनाबाबत एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी देखील दिलेल्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 


नोव्हेंबरमध्ये पहिली घटना समोर


अमेरिकन एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार एइरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी दिल्लीच्या पोलिस अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला. दरम्यान सहप्रवाशांवर लघुशंका करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. गेल्यावर्षी  26 नोव्हेंबरला मद्यधुंद प्रवाशाने एअर इंडियाच्या न्यूयॉर्क - दिल्ली प्रवासादरम्यान बिजनेस क्लासमधीस 70 वर्षीय महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची   एअरलाइन्सने (Airlines)   गांभीर्याने दखल घेतली.  तसेच याप्रकरणी डीजीसीएने (DGCA)  कठोर पावले उचलली आहेत. 


 लघुशंका प्रकरणानंतर धोरणात बदल


विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटनानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA)  फ्लाईटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबतच्या धोरणात बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार, आता विमान प्रवासात प्रवाशांना मर्यादित (Limited) प्रमाणात दारू देण्यात येणार आहे. सुधारित धोरणानुसार, क्रू मेंबर्सनी सेवा दिल्याशिवाय प्रवाशांना मद्यपान करण्याची परवानगी नसणार आहे. क्रू मेंबर्सनी मद्य प्राशन करणाऱ्या प्रवाशांच्याबाबतीत दक्ष राहावं. नव्या धोरणानुसार, "अल्कोहोलिक पेय ही प्रमाणात सर्व्ह करावीत. तसेच, एखादा प्रवाशी वारंवार अल्कोहोलयुक्त पेय मागत असेल, तर त्याला नकार देण्याचा अधिकारही क्रू-मेंबर्सना देण्यात आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Air India: लघुशंका प्रकरणानंतर Air India कडून नियमांत बदल; मद्यप्राशन करणाऱ्या प्रवाशांना...