पुलवामातील दहशतवाद्यांकडे अमेरिकन बनावटीची शस्त्र
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 12:33 PM (IST)
दहशतवाद्यांकडे मिळालेल्या रायफल या अमेरिकन बनावटीच्या आणि महत्वाचं म्हणजे अमेरिकन सैन्याच्या असल्याची माहिती सैन्याकडून दिली गेली.
जम्मू-काश्मीर : काश्मीरच्या पुलवामात ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीची शस्त्रं मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. काल भारतीय सैन्य आणि पुलवामात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या पुतण्या तल्हा रशीदसह दोघांचा खात्मा झाला. या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आलं. यानंतर चकमकीविषयी माहिती देताना सैन्याच्या प्रवक्त्यांनी थेट दहशतवाद्यांकडून जप्त केलेली शस्त्रचं समोर ठेवली. दहशतवाद्यांकडे मिळालेल्या रायफल या अमेरिकन बनावटीच्या आणि महत्वाचं म्हणजे अमेरिकन सैन्याच्या असल्याची माहिती सैन्याकडून दिली गेली. त्यामुळे दहशतवाद्यांकडे अमेरिकन बनावटीची शस्त्रं आली कुठून असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दरम्यान, अद्यापही लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित बातम्या : काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, मसूद अझहरच्या पुतण्याचाही खात्मा