वलसाड (गुजरात) : जम्मू काश्मीरमध्ये एका मसिहानं अनेक शिवभक्तांचे प्राण वाचवले आहेत. ज्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या बसच्या चालकानं प्रसंगावधान दाखवून अनेक भाविकांचा जीव वाचवला.


सलीम शेख असं या बस चालकाचं नाव आहे. जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी सलीम शेख यांना दोन लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे. सलीम हे गुजरातमधील वलसाडचे रहिवाशी आहेत.

अमरनाथ रस्त्यावर जात असताना दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. मात्र या परिस्थितीतही सलीम डगमगले नाहीत.

पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड

दहशतवाद्यांकडून गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही ते बस चालवत राहिले आणि प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचवलं.

त्यांच्या याच धाडसामुळं आज अनेक शिवभक्त सुखरुप आहेत. ही बातमी समजताच शेख परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही, मात्र 7 भाविक गेल्याचं दु:खही त्यांच्या परिवाराला आहे.

गोळीबारातही बस सुसाट पळवली

दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला, त्यावेळी सलीम यांनी चालाखी दाखवली. सलीम यांनी त्या परिस्थितीतही बस सुसाट पळवली. प्रचंड गोळीबारात त्यांनी बस मिलिट्री कॅम्पपर्यंत आणली.

सलीम यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं, तर या हल्ल्याची तीव्रता आणखी वाढली असती.

बसवर गोळीबार झाला, त्यावेळी ती बस अमरनाथ यात्रा करुन परतत होती. त्यावेळीच दहशतवाद्यांनी डाव साधून गोळीबार केला. त्यावेळी सलीम यांनी बस न थांबवता, ती तशीच चालू ठेवली.

ज्या बसवर हल्ला झाला त्या बसमध्ये 56 प्रवासी होते. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

...तेव्हा बाळासाहेबांमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती : संजय राऊत 

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यावर वीरुचं संवेदनशील ट्विट 

पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड

अमरनाथ हल्ला : पालघरमधील 2, तर गुजरातमधील 5 भाविकांचा मृत्यू