लखनऊ : समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी सपाच्या दारुण पराभवावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेससोबत युती केली नसती, तर सपा पुन्हा सत्तेत आली असती, अशी प्रतिक्रिया मुलायम सिंह यांनी दिली.


काँग्रेससोबत युतीला आपला अगोदरपासूनच विरोध होता आणि युतीने काहीही फायदा होणार नाही, असं आपण सर्वांसमोर सांगितलं होतं. म्हणूनच युतीचा प्रचारही केला नाही. सपाने स्वबळावर निवडणूक लढवायला पाहिजे होती, असं मुलायम सिंह म्हणाले.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला कुणीही स्वीकारणार नाही, हे आमचे नेते ओळखू शकले नाहीत. युतीची गरजच काय होती, असं म्हणत युतीमुळेच पराभव झाला, या शिवपाल यादव यांच्या वक्तव्याचं समर्थनही मुलायम सिंह यांनी केलं.

आपण मोठ्या मेहनतीने पक्ष उभा केला आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. 2012 साली मुलगा अखिलेशच्या हातात सत्ता दिली. पण यावेळी भाजपचा धक्कादायक विजय असून सपाचा धक्कादायक पराभव आहे, असं मुलायम सिंह म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मोदी लाटेवर सवार होत सपा, बसपा आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. काँग्रेस-सपा युतीला केवळ 54 जागा मिळवता आल्या. यामध्ये सपाच्या 47, तर काँग्रेसच्या 7 जागा आहेत. भाजपने 403 आमदार असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत मित्रपक्षांसह 325 जागा मिळवल्या. यात एकट्या भाजपच्या 312 जागा आहेत.

संबंधित बातम्या :

पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र


Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल


देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य


UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल


Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल


GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल


Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल


Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल